नवी दिल्ली : 10 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. लवकरच दहा रुपयाच्या प्लास्टिकच्या नोटा देशातील पाच शहरात चलनात येणार आहेत.
प्लॅस्टिक नोटा बाजारात येणार असल्या, तरी सध्या चलनात असलेल्या कागदी नोटा बाद केल्या जाणार नाहीत. बनावट नोटांना रोखण्यासाठी प्लास्टिक नोटा आणण्यामागे प्रमुख उद्देश आहे.
कागदी नोटांना पर्याय म्हणून या नोटा आणल्या जात आहेत. तसेच नोटांचं आयुष्य वाढवणं हा प्लास्टिकच्या नोटा आणण्यामागचा उद्देश आहे. देशातील कोची, म्हैसूर, जयपूर, शिमला आणि भुवनेश्वर या पाच शहरांत या प्लास्टिक नोटा चलनात येणार आहेत.
या प्लास्टिक नोटा सध्या प्रायोगित तत्वावर चलानात आणल्या जातील. हा प्रयोग यशस्वी झाला तर संपूर्ण देशात दहा रुपयाच्या प्प्लास्टिकच्या नोटा चलनात येणार आहेत, तशी माहिती राज्य वित्त मंत्रायलयाच्यावतीने जयंत सिन्हा यांनी दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.