बोकारो : झारखंडमधल्या बोकारोमध्ये पंचायतीन दिलेल्या तालिबानी निर्णयामुळे नीचतेची आणखी एक पातळी ओलांडली गेलीय. पत्नीची छेडछाड काढणाऱ्याच्या 10 वर्षांच्या बहिणीवर त्यांने आदेशानंतर पंचायतीसमोर बलात्कार केला.
बोकारो या गावातल्या एकाने मद्यपान करुन शेजा-याच्या घरात घुसून एका विवाहीत महिलेची छेडछाड केली. याची तक्रार त्या महिलेच्या पतीने गावातील पंचायतीकडे केली. तक्रारीची दखल घेत पंचायतीने अजब न्याय दिला. छेडछाड तरुणाला अद्दल घडविण्यासाठी त्याच्या अल्पवयीन बहिणीला आयुष्यातून उठविण्याचा निर्णय दिला.
तक्रारीनंतर गावातल्या पंचायतीनं अन्यायग्रस्त महिलेच्या पतीने छेडछाड करणा-या युवकाच्या 10 वर्षांच्या बहिणीवर सर्वांदेखत बलात्कार करण्याचा आदेश दिला. पंचायतीच्या या आदेशानंतर संपूर्ण गावाच्या जमलेल्या लोकांसमोर त्या निष्पाप मुलीवर बलात्कार करण्यात आला. ही घृणास्पद आणि चिड आणणारा प्रकार सुरु असताना गावातला एकही व्यक्ती हा तालिबानी प्रकार रोखण्यासाठी पुढे आला नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.