भुवनेश्वर : ओडिशामधील पुरी जिल्ह्यात तब्बल २० मानवी कवट्या सापडल्या आहेत. रविवारी एका उड्डाणपुलाखाली कवट्यांसह पूजेचे काही साहित्य सापडलंय.
ओडिशाची राजधानी भुवनेश्वरपासून २५ किलोमीटर अंतरावर पुरी ते कोणार्क दरम्यानच्या कुशाभद्र नदीच्या पात्रात पुलाखाली या कवट्या आढळल्या.
उड्डाणपुलाजवळ आम्हाला २० मानवी कवट्या मिळाल्या आहेत. याशिवाय, तीन म्हशींच्या कवट्या आणि काही लहान हाडे नदी पात्रात मिळाली, अशी माहिती निमपाडा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष मोहंती यांनी दिलीय.
काही तांत्रिकांनी या ठिकाणी कर्मकांड केले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तपासानंतरच वस्तुस्थिती समोर येईल, असे त्यांनी सांगितले. भगव्या वस्त्रासह पूजेचे काही साहित्यही त्या ठिकाणी सापडल्याचे त्यांनी नमूद केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.