...जेव्हा सोनियांच्या किंचाळीनं गडबडला १० जनपथ!

माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांची पुण्यतिथी... सोनिया गांधींच्या आयुष्यातला तो एक कठिण प्रसंग होता... ज्याला त्या मोठ्या धैर्याने सामोऱ्या गेल्या.

Updated: May 21, 2017, 04:27 PM IST
...जेव्हा सोनियांच्या किंचाळीनं गडबडला १० जनपथ!  title=

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांची पुण्यतिथी... सोनिया गांधींच्या आयुष्यातला तो एक कठिण प्रसंग होता... ज्याला त्या मोठ्या धैर्याने सामोऱ्या गेल्या.

सोनिया गांधी यांचं चरित्र लिहिणाऱ्या रशिद किडवाई यांनी आपल्या पुस्तकात या घटनेचा प्रसंग वर्णन केलाय. 

तामिळनाडूच्या एका रॅलीमध्ये राजीव गांधींचं एका आत्मघाती हल्ल्यात निधन झालं... ही घटना घडली त्यानंतर चेन्नईहून एक फोन कॉल दिल्लीला केला गेला... हा फोन केला होता राजीव गांधींच्या खाजगी सचिवांनी... त्यांनी सोनियांशी महत्त्वाचं बोलायचं होतं... पण, ही गोष्ट त्यांना कशी सांगावी हा प्रश्न त्यांना पडला होता. 

फोन घेतला तो जॉर्ज यांनी... 'राजीव कसे आहेत?' असा प्रश्न त्यांनी विचारला त्यावर उत्तरादाखल त्यांना केवळ शांतता मिळाली... तेव्हा त्यांनी ओरडून विचारलं... 'तुम्ही सांगत का नाही की राजीव कसे आहेत?'... फोन करणाऱ्या व्यक्तीनं यावर 'ते आता या जगात नाहीत' असं म्हटलं... फोन बंद झाला...


फाईल फोटो

चेन्नईवरून ही सूचना मिळाल्यानंतर राजीव गांधींचे विशेष सचिव धावत आणि ओरडत १० जनपथच्या आतल्या दिशेत धाव घेतली... आवाज ऐकत सोनिया बाहेर धावल्या... जॉर्ज घाबरत म्हणाले... 'मॅडम चेन्नईमध्ये बॉम्बस्फोट झालाय'... सोनियांनी विचारलं... 'इज ही अलाइव्ह'... त्यानंतर त्यांना उत्तर मिळालं नाही... आणि शांततेचं त्यांना आपल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं.

त्यानंतर १० जनपथवर जे पाहिलं गेलं ते केवळ भयंकर होतं. सोनिया गांधी किंचाळत रडत होत्या... त्याच वेळी सोनिया गांधींना अस्थमाचा अटॅक आला... आणि त्यांची प्रकृती बिघडली... प्रियांका गांधी त्यांची औषधं शोधत होत्या... आवाज ऐकल्यानंतर काँग्रेस नेते मोठ्या प्रमाणात जमा झाले... अनेक जण सोनियांना सांत्वना देण्याचा प्रयत्न करत होते.