www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यावेळी राष्ट्रीय सुरक्षा दलाचा कमांडो सुरेंदर सिंग यांनी दहशतवाद्यांचा खात् माकरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणूकीत ‘आम आदमी पार्टी’च्या तिकिटावर दिल्ली कॅण्टोन्मेंट मतदारसंघातून लढवली.
सुरेंदर सिंग यांनी २६ हजार १२४ मतं मिळवून तीन वेळा आमदार असलेले भाजपाचे उमेदवार करणसिंह तलवार यांचा पराभव केला. राजकारणात येण्यापूर्वी सुरेंदर भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय सुरक्षा कमांडो गटात म्हणजेच एनएसजीमध्ये होते. २६/११च्या हल्यात ते अपंग झाल्यानं वैद्यकीय कारणास्तव त्यांना सेवानिवृत्त व्हावं लागलं होतं.
यावेळी ते म्हणाले की, ‘जब फौज मे था तब भी जान हाजीर थी, आज भी हाजीर है’ या शब्दात त्यांनी लोकांसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि जनतेचे आभार मानले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.