www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीमध्ये भाजप आणि आम आदमी पार्टी सत्ता स्थापण्या ऐवजी विरोधी बाकांवर बसण्यास पसंती देत असताना किरण बेदींनी मात्र दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची सूचना केलीय.
भाजप आणि आम आदमी पार्टीनं किमान समान कार्यक्रम तयार करावा आणि त्यातून तोडगा काढावा अशी सूचना किरण बेदींनी केलीय. मात्र किरण बेदींचा हा प्रस्ताव आम आदमी पार्टीनं फेटाळलीय.
तर दुसरीकडं दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीच्या यशानंतर सगळ्यांनीच धडा घ्यायला हवा, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलीय... देशभरात सध्या काँग्रेस विरोधी लाट आहे. आता काँग्रेसला तारणं अशक्य असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.