दिल्ली : तुम्हाला धक्का बसेल की, देशात सरासरी प्रत्येक दहा लाख रूपयात २५० नोटा बनावट असतात. एका रिपोर्टनुसार ४०० कोटी रूपयांच्या नकली नोटा लोकांकडे आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, भारतीय बाजारात प्रत्येक वर्षी ७० कोटी रूपयांच्या नकली नोटा चलनात येतात.
हा आर्थिक दहशतवाद असल्याचं सरकारने म्हटलं आहे, या आर्थिक दहशतवादाचा सामना करण्यासाठी सीबीआय, आयबी, डीआयआय आणि रॉ आणि राज्य पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.