चेन्नई: कधी आपण तब्बल चार हजार पोपट एकत्र, एकाच रांगेत दाणे टिपतांना पाहिलेत? आपण जर हे दृश्य पाहिलं नसेल तर आता पाहा....
चेन्नईमध्ये राहणारे ६२ वर्षीय शेखर दररोज सकाळी ४ वाजता उठतात आणि आपल्या या हिरव्या पंखांच्या मित्रांसाठी दाणे आणि पाणी ठेवतात. शेखर यांच्या घराच्या छतावर दररोज हजारोंच्या संख्येनं पोपट एका रांगेत येतात आणि एकत्र दाणे टिपतात.
पक्ष्यांवरील शेखर यांच्या प्रेमामुळं त्यांना 'बर्डमॅन' नावानंही ओळखतात. गेल्या १० वर्षांमध्ये शेखर यांनी हजारो पोपटांचं पोट भरलंय.
पाहा भारतातील बर्डमॅन! -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.