नवी दिल्ली : लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठीच्या तात्काळ तिकीटांच्या आरक्षणात आता चढ्या दरांची डायनॅमिक पद्धत अंमलात आणली जाणार आहे. तात्काळ तिकिटांच्या एकूण तिकिटांपैकी उर्वरीत ५० टक्के तिकिटांसाठी ही पद्धत वापरली जाणार आहे. त्यामध्ये सुद्धा प्रत्येक दहा टक्के तिकिटांनंतर आरक्षणाचे दर तब्बल २० टक्क्यांनी वाढवले जाणार आहेत.
मध्य रेल्वेच्या काही निवडक गाड्यांसाठी ही पद्धत लगेचच अंमलात येत आहे. यामध्ये या खालील गाड्यांचा यात समावेश आहे.
> १२०५१ दादर-करमाळी जनशताब्दी एक्स्प्रेस
> ११०५० श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) - अहमदाबाद एक्स्प्रेस
> १२८०९ छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई - हावरा मेल व्हाया - नागपूर
> ११००५ दादर-पदुचेरी एक्स्प्रेस
> ११०२१ दादर-तिरुनेलवेली एक्स्प्रेस
> ११०८८ पुणे - विरावल एक्स्प्रेस
> ११०९० पुणे-भगत की कोठी (जोधपूर) एक्स्प्रेस
> ११०९२ पुणे-भूज एक्स्प्रेस
> ११०९६ पुणे-अहमदाबाद अहिंसा एक्स्प्रेस
> १२१०१ लोकमान्य टिळक टर्मिनस - हावरा ज्ञानेश्वर एक्स्प्रेस
> १२१२९ पुणे - हावरा आझाद हिंद एक्स्प्रेस
> १६३५१ छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई - नागरकोईल एक्स्प्रेस
> १६३८१ छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई - कन्याकुमारी एक्स्प्रेस
> १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस - शालीमार एक्स्प्रेस
> ११०६१ लोकमान्य टिळक टर्मिनस - मुजफ्फरपूर एक्स्प्रेस
> ११०६५ लोकमान्य टिळक टर्मिनस - दरभंगा एक्स्प्रेस
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.