नवी दिल्ली: राष्ट्रपतींकडून सहा राज्यसभा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी, भाजपचे माजी खासदार आणि क्रिकेटपटू नवजोतसिंग सिद्धू, माजी वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर मेरी कोम, बंगालमधले भाजप नेते स्वपनदास गुप्ता आणि मल्याळम अभिनेते सुरेश गोपी यांची वर्णी लागलीय.
नरेंद्र जाधव हे पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु तसंच नियोजन आयोगाचे सदस्य आहेत. राज्यसभेच्या आत्ताच्या खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे या नव्या सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपतींनी केली आहे.