सात वर्षांच्या मुलाचं अपहरण, खंडणी म्हणून मागितला ट्रॅक्टर

अपहरणाची अनेक प्रकरणं तुम्ही ऐकली असतील, मात्र हे प्रकरण जरा वेगळचं आहे. कारण अपहरणकर्त्यांनी खंडणी म्हणून चक्क ट्रॅक्टर मागितला आहे.

Updated: May 15, 2015, 01:41 PM IST
सात वर्षांच्या मुलाचं अपहरण, खंडणी म्हणून मागितला ट्रॅक्टर title=

झाशी : अपहरणाची अनेक प्रकरणं तुम्ही ऐकली असतील, मात्र हे प्रकरण जरा वेगळचं आहे. कारण अपहरणकर्त्यांनी खंडणी म्हणून चक्क ट्रॅक्टर मागितला आहे.

उत्तर प्रदेशातील झाशीमधील वीरपुरा-गरोठा गावातील ७ वर्षीय प्रदिपचं गेल्या आठवड्यात अपहरण झालं होतं. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेल्या मुलाची आईनं झाशीच्या एसएसपी किरण एस. यांना भेटून आपल्या मुलाला वाचवण्याची विनंती केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरणकर्त्यांनी प्रदीपच्या कुटुंबियांना फोन करून खंडणी मागितलीय. मुख्य म्हणजे, या अपहरणकर्त्यांनी पैशाची मागणी न करता एका ट्रॅक्टरची मागणी केलीय. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. परंतु, या अपहरण प्रकरणात प्रदीपच्या नातेवाईकांचाच हात असल्याची दाट शक्यता पोलिसांना वाटतेय. 

एसएसपींनी गरोठा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठांना या प्रकरणाचा छडा लागवण्याचे आदेश दिले आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.