छेडछाडीनंतर बसमधून दोन बहिणींना गाडीतून बाहेर फेकून दिलं

पंजाबच्या मुक्तसरमध्ये पुन्हा एकदा चालत्या बसमध्ये मुलींची छेडछाड आणि मारहाणीचं प्रकरण पुढे आलंय. ही बस एका अकाली दल नेत्याची आहे. धक्कादायक म्हणजे, मारहाणीनंतर या मुलींना गाडीतून बाहेर फेकून दिलं गेलं. 

Updated: May 15, 2015, 01:22 PM IST
छेडछाडीनंतर बसमधून दोन बहिणींना गाडीतून बाहेर फेकून दिलं title=

पंजाब : पंजाबच्या मुक्तसरमध्ये पुन्हा एकदा चालत्या बसमध्ये मुलींची छेडछाड आणि मारहाणीचं प्रकरण पुढे आलंय. ही बस एका अकाली दल नेत्याची आहे. धक्कादायक म्हणजे, मारहाणीनंतर या मुलींना गाडीतून बाहेर फेकून दिलं गेलं. 

बसच्या कंडक्टरनं दोन बहिणींसोबत छेडछाड करून त्यांना मारहाणही केलीय. मुक्तसरमध्ये कंटक्टनरनं मारहाणीनंतर या दोन्ही बहिणींना बसच्या बाहेर फेकून दिलं. 

या घटनेनंतर या दोन्ही बहिणी आपल्या कुटुंबाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेल्या तेव्हा पोलिसांनी मात्र या प्रकरणाची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. पोलिसांनी बस कंडक्टरच्या विरोधातही तक्रार नोंदवली नाही. 

यानंतर पीडित मुलींच्या वडिलांनी आपण अशा परिस्थितीत आपल्या मुलींना शिक्षणासाठी पाठवू शकत नसल्याचं म्हटलंय. 

उल्लेखनीय म्हणजे, २९ एप्रिल रोजी पंजाबच्या मोगामध्ये ऑर्बिट बस सर्व्हिसमध्येही छेडछाडीचा विरोध केल्यानंतर एका अल्पवयीन मुलीला आणि तिच्या आईला चालत्या बसमधून बाहेर फेकून देण्याची घटना घडली होती. या घटनेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला होता. ही बस ऑर्बिट एव्हिएशन्सची होती आणि ही कंपनी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्या नातेवाईकांची होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.