नवी दिल्ली : सामान्यांना त्रास होत असल्याच्या नावाने विरोध पक्ष बोटं मोडत असून याचं राजकारण करत आहेत. पण बहुतांशी लोकांनी या निर्णयाला योग्य म्हटले आहे.
इनशॉर्ट्स आणि इप्सॉसतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ८२ टक्के लोक पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बाद केल्याचे समर्थन करीत आहे.
८४ टक्के लोकांचे म्हणणे आहे, ते काळ्या पैशावर लगाम लावण्यावर गंभीर आहेत. नोट बंदीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर त्वरित आठ आणि नऊ नोव्हेंबर रोजी सर्वेक्षण करण्यात आले. त्यात २ लाख ६९ हजार ३९३ लोकांना अॅपद्वारे सर्वेक्षणात भाग घेतला.