आता रेशनदुकानात आधारकार्ड सक्तीचे

रेशन दुकानावर स्वस्त दरात धान्य मिळवण्यासाठी आधार नंबर बंधनकारक करण्यात आलंय. केंद्र सरकारनं गुरुवारी यासंदर्भातले निर्देश जारी केले. दरम्यान ज्या रेशनकार्ड धारकांकडे आधार नंबर नाही, अशांना येत्या 30 जूनपर्यंत अर्ज करून आधार कार्ड काढण्याची मुदत देण्यात आली आहे. 

Updated: Feb 10, 2017, 08:28 AM IST
आता रेशनदुकानात आधारकार्ड सक्तीचे title=

नवी दिल्ली : रेशन दुकानावर स्वस्त दरात धान्य मिळवण्यासाठी आधार नंबर बंधनकारक करण्यात आलंय. केंद्र सरकारनं गुरुवारी यासंदर्भातले निर्देश जारी केले. दरम्यान ज्या रेशनकार्ड धारकांकडे आधार नंबर नाही, अशांना येत्या 30 जूनपर्यंत अर्ज करून आधार कार्ड काढण्याची मुदत देण्यात आली आहे. 

त्यानंतर मात्र आधार नंबर शिवाय स्वस्त दरात अन्नधान्य मिळणार नाही असं सरकारी आदेशात नमूद करण्यात आलं आहे.  सरकार अन्नधान्याच्या अनुदानापोटी सुमारे 1 लाख 40 हजार कोटी रुपये खर्च करते. 

हे अनुदान योग्य व्यक्तींपर्यंत पोहचावं यासाठी आधार नंबरची मदत घेण्यात येत आहे. याआधी अनुदानित घरगुती गॅससिंलिंडरसाठी आधार नंबर बंधनकारक करण्यात आलाय. 

दरम्यान तूर्तास ज्यांच्याकडे आधर कार्ड नाही, अशा नागरिकांना 30 जूनपर्यंत रेशनकार्डासोबत आधार कार्डासाठी अर्ज केल्याची पावती सादर करता येईल. जोपर्यंत ही पावती हाती येत नाही, तोवर मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, पासपोर्ट इत्यादी आठ सरकारमान्य ओळखपत्रांद्वारेही स्वस्त दरात धान्य मिळत राहणार आहे. शिवाय सरकारनं आधारकार्ड काढण्यासाठी अर्ज करण्याची सुविधाही रेशन दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.