ब्रॅण्ड अॅम्बेसडर नसलो, तरी भारत हा अतुल्यच राहणार : आमिर खान

आमिरला अतुल्य भारत या मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडर पदावरुन काढून टाकण्यात आले आहे.

Updated: Jan 7, 2016, 08:00 PM IST
ब्रॅण्ड अॅम्बेसडर नसलो, तरी भारत हा अतुल्यच राहणार : आमिर खान title=

मुंबई : अभिनेता आमिर खानला अतुल्य भारत या मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडर पदावरुन काढून टाकण्यात आले आहे. पर्यटन विभागाने आमिर खानसोबत अतुल्य भारत मोहिमेसाठी झालेला करार संपलेला नाही, असे सांगून मिडीयातील बातम्या चुकीच्या ठरवण्याचा प्रयत्न केला. मात्र आमिरच्या बदल्यात अमिताभ बच्चन यांची निवड करण्याक आल्याचं आज समोर आलं.

आमिर खानने याविषयी मिडीयाशी बोलताना सांगितले, अतुल्य भारत मोहिमेचा गेली दहा वर्षे मी ब्रॅण्ड अॅम्बेसडर होतो. हा माझ्यासाठी मोठा सन्मान समजतो. देशाची सेवा करण्यासाठी मला संधी मिळाली याचा मला सार्थ अभिमान आहे. यापुढेही देशाची सेवा करण्यास तयार आहे. 

आत्तापर्यंत मी पब्लिक सर्व्हिस फिल्मसाठी मोफत काम करत आलो आहे. अशाप्रकारे मला देशाची सेवा करण्यासाठी संधी मिऴाली, त्यामुळे मला हा मिऴालेला सन्मान समजतो. 

अतुल्य भारत मोहिमेसाठी ब्रॅण्ड अॅम्बेसडर असावा की नाही, असल्यास कोण असावा हे ठरविण्याचा अधिकार सरकारचा आहे. त्यामुळे अतुल्य भारत मोहिमेसाठी ब्रॅण्ड अॅम्बेसडर पदावरुन मला काढण्याचा सरकारच्या निर्णयाचा मी आदर करतो. 

सरकारकडून देशासाठी जे सर्वोत्तम असेल, त्याचदृष्टीने पुढची पावलं उचलली जातील, अशी मला खात्री आहे. तसेच, मी ब्रॅण्ड अॅम्बेसडर नसलो, तरी आपला देश हा अतुल्यच राहणार, असल्याचे आमिर खानने सांगितले.