नवी दिल्ली: काळा पैसा प्रकरणी कारवाई करण्यात केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप करतानाच काळा पैसा दडवणाऱ्यांमध्ये अंबानी बंधू, नरेश गोयल, यशवर्धन बिर्ला यांचासह आणखी १५ मोठ्या उद्योजकांचा समावेश असल्याचा दावा आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
केंद्र सरकारनं सोमवारी सुप्रीम कोर्टासमोर काळा पैशाप्रकरणी तीन खातेधारकांची नावं सादर केली. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन काळा पैसा प्रकरणातील १५ खातेधारकांची यादी जहीर केली. केजरीवाल म्हणाले, आम्ही यापूर्वीच काळा पैसा प्रकरणातील खातेधारकांची यादी जाहीर केली होती.
त्या यादीमध्ये प्रदीप बर्मन यांचं नाव होतं. सोमवारी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या तिघा जणांमध्ये बर्मन यांचा समावेश आहे. त्यामुळं आपनं जाहीर केलेली यादी योग्य होती असं त्यांनी आवर्जून सांगितलं. यानंतर केजरीवाल यांनी आणखी १५ जणांची नावंही जाहीर केली.
पाहा केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या यादीतील नावं
यांनीही परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा दडवला आहे असा दावा केजरीवाल यांनी केला. केंद्र सरकार या प्रकरणात पक्षपातीपणे कारवाई करत असून सर्व ८०० खातेधारकांची यादी त्यांनी जाहीर करावीत असं त्यांनी सांगितलं. देशाचे पंतप्रधान एका मोठ्या उद्योगसमुहाच्या मुंबईतील रुग्णालयाचं उद्घाटन करतात. यामुळं आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना चुकीचा संदेश जातो असा टोलाही त्यांनी लगावला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.