www.24taas.com, गुवाहाटी
मुस्लिम आणि बांगलादेशी घुसखोरांमुळे भडकलेल्या दंगलीचा वणवा आसाममध्ये कायम आहे. चिरंग जिल्ह्यात शनिवारी झालेल्या भीषण हिंसाचारात २ जण ठार झाले असून, येथे बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यापासून आसाममध्ये दंगलीचा वणवा पेटलेला आहे.
त्यावरून मुंबईसह देशाच्या इतर भागांतही धर्मांध मुस्लिमांनी हिंसाचार घडविला. आसाम दंगलीत आतापर्यंत ८० वर लोकांचे बळी गेले असून, तब्बल ५ लाख बोडो आदिवासी बेघर झाले आहेत. आसाममधील कॉंग्रेस सरकारने बोडालँड पीपल्स फ्रंटचे आमदार प्रदीप ब्रम्हा यांना गुरुवारी अटक केली.
त्यांच्या अटकेनंतर शनिवारी चिरंग जिल्ह्यात हिंसाचारामध्ये २ जण ठार झाले. दरम्यान, कोक्राझार, दुबरी या जिल्ह्यांमध्ये संचारबंदी कायम आहे.