नवी दिल्ली: अर्जेंटिना आणि चिलीदरम्यानच्या पर्वत रागांमध्ये गिर्यारोहण करताना बेपत्ता झालेला भारतीय गिर्यारोहक मल्ली मस्तान बाबू याचा मृतदेह सापडला आहे.
एका प्रवतावर चढताना तो मार्चमध्ये रोजी बेपत्ता झाला होता, तेव्हापासून त्याचे सहकारी त्याचा शोध घेत होते. त्यासाठी ' रेस्क्यू मल्ली मस्तान बाबू' या नावानं फेसबूक पेजही बनविण्यात आलं होतं. अखेर त्याच पेजवरून त्याचा मृतदेह सापडल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली.
मूळचा आंध्र प्रदेशमधील रहिवासी असणाऱ्या मल्ली मस्तान बाबूनं २००६ मध्ये १७२ दिवसांत ७ शिखरं पार केली होती. त्यामुळं जगातील सात शिखरे सर्वात जलद सर करणारा गिर्यारोहक अशी त्याची ओळख होती.
RIP #MalliMastanBabu. With his friends & family we are working with authorities in Argentina & Chile on next steps in a difficult situation.
— Syed Akbaruddin (@MEAIndia) April 4, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.