'वॅगन आर'नंतर आता 'आप' समर्थकानं पक्षाचा लोगो मागितला

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षासमोरचे संकटं काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीय. पक्षाच्या एका समर्थकानं अरविंद केजरीवाल यांना दिलेली वॅगन आर कार परत मागितल्यानंतर आता आता एका 'आप'चा लोगो परत मागितला. पक्षाच्या एका कार्यकर्त्यानं लोगो वापस करण्याची मागणी केलीय.

Updated: Apr 8, 2015, 04:35 PM IST
'वॅगन आर'नंतर आता 'आप' समर्थकानं पक्षाचा लोगो मागितला  title=

नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षासमोरचे संकटं काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीय. पक्षाच्या एका समर्थकानं अरविंद केजरीवाल यांना दिलेली वॅगन आर कार परत मागितल्यानंतर आता आता एका 'आप'चा लोगो परत मागितला. पक्षाच्या एका कार्यकर्त्यानं लोगो वापस करण्याची मागणी केलीय.

आम आदमी पक्षाचा लोगो तयार केल्याचा दावा करणारा कार्यकर्ता सुनील लालनं पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून तो परत मागितलाय. सुनीलनं सांगितलं की, ही माझी बौद्धिक संपत्ती आहे म्हणून ती मला परत करा. सुनीलनं केजरीवालला पत्र लिहून सांगितलं की, आता त्याला पक्षात राहण्याची इच्छा नाहीय म्हणून त्याचा राजीनामाही मंजूर करावा.

Revoking My Intelligent property THE AAP LOGOTYPE from AAM AADMI PARTY. Letter send to its Convenor Shri Arvind... http://t.co/JLw1lcJWKQ

— Sunil Lal (@sunil2819) April 7, 2015

सुनील लालनं ट्विट केलंय, 'मी आपली बौद्धिक संपदा आपचा लोगो वापस मागतोय. यासाठी आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना मी पक्ष लिहिलंय. आपल्या पत्रात सुनीलनं दावा केलाय ती, आपच्या लोगोचं डिझाईन त्यांनी केलंय.' आपला लोगो ब्रँडिंग, स्टेशनरी, वेबसाइट, फ्लेक्स, पोस्टर, बॅनर यासर्व ठिकाणांवरून काढून टाकण्याची मागणीही सुनीलने केलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.