लखनऊ : 'मॅगी'नंतर आता पाळी आहे नेस्ले इंडियाच्या 'पास्ता'ची... कारण, आता 'नेस्ले इंडिया'च्या पास्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.
उत्तरप्रदेशातल्या मऊमध्ये नेस्लेच्या पास्ताचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. तपासणीअंती त्यातही शिशाचं प्रमाण जास्त असल्याचं आढळलं. त्यामुळे 'फूड अॅन्ड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन'नं कंपनीला याबाबतचं पत्र दिलं. यामध्ये, शिशाचं प्रमाण जिथं २.५ पीपीएम असायला हवं तिथं या पास्तात ६ पीपीएम या प्रमाणात शिसं आढल्याचं एफएसएसआयनं म्हटलंय.
त्यामुळे, पास्ताही आता 'अनसेफ फूड कॅटेगिरी'मध्ये आलाय. यावर स्पष्टीकरण देण्यासाठी कंपनीला एक महिन्यांची वेळ देण्यात आलीय.
यापूर्वी, 'नेस्ले'चं प्रोडक्ट असणाऱ्या मॅगी नुडल्सवरही बॅन लावण्यात आला होता. परंतु, कायदेशीर लढाईनंतर मॅगी नुडल्स पुन्हा एकदा बाजारात आलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.