www.24taas.com, नवी दिल्ली
बोइंगच्या ड्रीमलाईनर विमानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर एअर इंडियानं या विमानाची सर्व उड्डाणं स्थगित केली आहेत. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशननं दिलेल्या जागतिक निर्देशांनंतर आणि डीजीसीएच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
एअर इंडियाच्या ताफ्यात ड्रिमलाईनर ७८७ जातीची ६ विमानं आहेत. या निर्णयामुळे पॅरीस आणि फ्रँकफर्टसाठी ड्रिमलाईनरऐवजी बोइंग ७७७ विमानं पाठवण्यात येतील. दरम्यान, बोइंगचे चेअरमन आणि सीईओ जिम मॅकनेरने यांनी ड्रिमलाईनर विमानं सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.
भारतात ड्रीमलायनर विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणात्सव एअर इंडियाने आपल्या सर्व सहा ड्रीमलायनर विमानांची उड्डाणं रद्द केली आहेत.