www.24taas.com, नवी दिल्ली
दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद करूनही उलट्या बोंबा मारणाऱ्या पाकिस्तानची भूमिका आता बदलली आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने बोलणी करण्यास तयार असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. दरम्यान, पाक लष्कराने सीमारेषवरील गोळीबार तत्काळ बंद करण्याचे आदेश आपल्या सैनिकांना दिलेत.
पाकिस्ताच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी भारतावर गंभीर आरोप करताना म्हटले होते, भारताची भाषा युद्धखोची आहे. त्यानंतर भारताने जोरदार आक्षेप घेत पारताला बजावले होते. त्यातच भारतीय लष्कर आणि राज्यकर्त्यांच्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तान नरमले.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मौन सोडत, यापुढे पाकिस्तानबरोबर सलोखा न ठेवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर बुधवारी उभय देशांतील लष्करी कारवाईच्या महासंचालकांची (डीजीएमओ) चर्चा झाली. या चर्चेवेळी नरमाईची भूमिका घेत पाकिस्तानने सीमा रेषेवर गोळीबार न करण्याचे मान्य केले आणि तसे आदेश सैनिकांना दिलेत.