नवी दिल्ली : एयर एशिया इंडियाने प्राईस वॉरमध्ये उडी घेऊन हवाई यात्रेच्या किमती उतरल्या आहेत. एका आठवड्याच्या ऑफरमध्ये देशांतर्गत प्रवासासाठी फक्त 699 रूपये भाडं ठेवण्यात आलं आहे. यात सर्व टॅक्सेसचा समावेश आहे.
भारतात बंगळुरूहून चेन्नई, कोच्ची, गोवा, जयपूर आणि चंदिगड आणि या सर्व शहरांपासून बंगळुरूचं तिकीट ६९९ रूपये करण्यात आलं आहे.
एअर एशिया बरहार्डच्या इंटरनॅशन फ्लाईटसमध्ये चेन्नई, कोच्ची, कोलकाता, बंगळुरू, तिरूचिरापल्ली आणि हैदराबादपासून क्वॉलालालंपुर आणि थाई एअर एशियाकडून चेनन्नईहून बँकॉकचं तिकीट २ हजार ५९९ रूपयात उपलब्ध असणार आहे.
ही तिकीटं एअर एशियाच्या वेबसाईटवरून रविवारी रात्रीपासून १६ नोव्हेंबरपर्यंत बुकिंसाठी उपलब्ध असतील, या तिकिटांचा ट्रॅव्हल पीरियड १० जून २०१५ ते १७ जानेवारी २०१७ असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.