नवी दिल्ली : दक्षिण भारतातलं शहर कोच्चीहून २ नोव्हेंबर रोजी सुरू झालेलं 'किस ऑफ लव्ह' अभियान कोलकातापासून थेट आता दिल्लीत पोहोचलं आहे.
या अभियानात आंदोलनकर्त्यांनी दिल्लीच्या संघ कार्यालयासमोर निदर्शनं करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांशी त्यांची जोरदार झडप झाली.
प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना मेट्रो स्टेशनजवळच थांबवलं.
फोटोत दिसणारं दृश्य हे दिल्लीतील झंडेवालान मेट्रो स्टेशनचं आहे, जेथे शनिवारी संध्याकाळी हिंदू सेनेचे कार्यकर्ते आणि किस ऑफ लव्ह अभियानचे समर्थक समोरासमोर आले होते.
खरंतर 'किस ऑफ लव्ह' अभियानचे समर्थक कोच्ची आणि कोलकाताच्या धर्तीवर दिल्लीतील झंडेवालान मेट्रो स्टेशन बाहेरील संघाचे कार्यालयासमोर प्रदर्शन करू इच्छीत होते. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
मागील आठवड्यात कालीकटच्या एका कॅफेत हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती, या कॅफेचा वापर डेटिंगसाठी करण्यात येतो. या विरोधात पहिल्यांदा कोच्ची आणि नंतर कोलकातात किस डे ऑफ लव्हच्या आयोजनाचा प्रयत्न करण्यात आला. आठवड्याभराच्या किस ऑफ लव्हचं वादळ दिल्लीत धडकलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.