नवी दिल्ली : पहिल्यांदा भारतीय लष्कराने LoC मध्ये PoKमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राइक कारवाई केली. पण ही सगळी प्लॅनिंग कोणी आखली. भारतीय लष्कराच्या या यशामध्ये कोणाचा हात आहे हे तुम्हाला माहित नसेल.
सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत सर्वात मोठा हात हा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांचा आहे. डोवाल यांनी इंडियन इंटेलिजेंस एजेंसिंकडून मिळालेली माहिती इनपूट आर्मीसोबत शेअर केली. बुधवारी रात्री सपूर्ण ऑपरेशनची रणनिती ठरली. जवानांना हॅलिकॉप्टरच्या माध्यमातून एलओसीच्या लाईन ऑफ कंट्रोलच्या त्या बाजूला उतरवण्यात आलं. एलओसीमधल्या ७ दहशतवादी ठिकाणांना जवानांनी लक्ष्य केलं आणि यामध्ये अनेक दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं.
म्यांमार स्ट्राइकमध्ये देखील डोवाल यांचा रोल :
- ४ जून, २०१५ मध्ये मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी लष्करावर हल्ला करत १८ जवानांना मारलं होतं.
- यानंतर कारवाईची योजना आखली गेली. डोवाल यांनी 6 जूनला पंतप्रधानांसोबत बांग्लादेशला जाण्याचा कार्यक्रम रद्द केला.
- हल्ल्यानंतर डोवाल काही दिवस मणिपूरमध्ये होते. येथे ते इंटेलिजेंस आणि लष्कराच्या इन्पुट्सवर नजर ठेवून होते.
- लष्काराला माहिती मिळाली होती की नक्षलवादी हे म्यांमारच्या सीमा भागात लपले होते. म्यांमार सीमेतही अशाच प्रकारे जवानांना पाठवून २ कॅम्प उद्धवस्त करत लष्काराने जवळपास १०० नक्षलवाद्यांना ठार केलं होतं.
कोण आहेत डोवाल
- १९६८ मध्ये केरळ बॅचचे ते आयपीएस ऑफिसर आहेत. ते ६ वर्ष पाकिस्तानात अंडरकवर एजेंट होते.
- डोवाल यांना पाकिस्तानात बोलल्या जाणाऱ्या उर्दूसहीत अनेक भाषांचं चांगलं ज्ञान आहे.
- एनएसए बनल्यानंतर सगळ्या गुप्तहेर संस्थेच्या प्रमुखांसोबत ते दिवसातून १० हून अधिक वेळा बोलतात.