www.24taas.com, मुंबई
मुंबईत झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी मोहम्मद अजमल कसाबने दिलेली द्या याचिका गृह मंत्रालयाने मंगळवारी रद्द केलीय. मंत्रालयाने कसाबची रद्द केलेली याचिका राष्ट्रपतींना पाठवण्यात आलीय.
यापूर्वी कसाबने राष्ट्रपतींसमोरही एक द्या याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालय कसाबला फाशीची शिक्षा सुनावली होती.
२६/११ च्या अतिरेकी हल्ल्यातील आरोपी असलेल्या कसाबला सर्वात आधी सत्र न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती.
यानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही कसाबला देण्यात आलेली शिक्षा कायम ठेवली, आणि अखेरिस २९ ऑगस्ट २०१२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने कसाबबद्दलच्या घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलायं. मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात एकट्या कसाबला जिवंत पकडण्यात आलं होतं.