'हिंसा' म्हणजे 'पुरुष'; मनेका गांधींचं समीकरण

 सगळ्या प्रकारच्या हिंसेला पुरुषच जबाबदार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी केलंय. 

Updated: Sep 15, 2015, 10:13 PM IST
'हिंसा' म्हणजे 'पुरुष'; मनेका गांधींचं समीकरण title=

नवी दिल्ली :  सगळ्या प्रकारच्या हिंसेला पुरुषच जबाबदार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी केलंय. 

फेसबुकवर विचारलेल्या प्रश्नांची लाईव्ह उत्तरं देताना त्यांनी हिंसा म्हणजे पुरुष असं समीकरण असल्याचं म्हटलंय. 'हिंसा ही पुरुषांच्या माध्यमातून उत्पन्न होते. हिंसाचाराला पुरुषच जबाबदार' असल्याचं मनेका गांधी यांचं म्हणणं आहे.

शाळांमध्ये 'जेंडर चॅम्पिअन' कार्यक्रम सुरु करण्यात आल्याची माहितीही मनेका गांधी यांनी दिली. जो मुलगा मुलींना मदत करेल... विद्यार्थिनींच्या प्रती आदर ठेवेल, त्याचा बक्षिस देऊन गौरव करण्यात येणार आहे. 

महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या फेसबुकवरील 'वुमन 100' या मोहिमेविषयी सुद्धा त्यांनी माहिती दिली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.