१३ दिवसांतच 'बाबा बर्फानी' वितळले!

अमरनाथ यात्रेकरूंना निराश करणारी एक बातमी आहे... बाबा बर्फानी या नावानं सुपरिचित असलेलं अमरनाथाचं बर्फाचं शिवलिंग वेळेपूर्वीच वितळलंय.

Updated: Jul 16, 2016, 11:04 AM IST
१३ दिवसांतच 'बाबा बर्फानी' वितळले! title=

श्रीनगर : अमरनाथ यात्रेकरूंना निराश करणारी एक बातमी आहे... बाबा बर्फानी या नावानं सुपरिचित असलेलं अमरनाथाचं बर्फाचं शिवलिंग वेळेपूर्वीच वितळलंय.

यात्रा सुरू झाल्यानंतर १३ दिवसांतच शिवलिंग वितळण्याची ही नजिकच्या इतिहासामधली पहिलीच घटना आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे शिवलिंग लवकर वितळल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

काश्मीरमध्ये सध्या परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे यात्रेत वारंवार खंड पडतोय. आतादेखील यात्रा दोन दिवसांसाठी थांबवण्यात आलीय.