लुधियाना : हुंड्यासाठी छळ प्रकरणात अटक होण्यापासून वाचलेली स्वयंमं घोषित साध्वी राधे माँच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. आता राधे माँ विरोधात पंजाबच्या लुधियानामध्ये मिनी स्कर्ट परिधान केल्या प्रकरणी केस दाखल करण्यात आली आहे.
तक्रारकर्त्याने दाखल केले तक्रारीत आरोप करण्यात आला की, राधे माँ स्वतःला दुर्गा देवीचा अवतार सांगते आणि मिनी स्कर्ट घातले. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.
अश्विनी कुमार बहल आणि धीरज शर्मा या तक्रारकर्त्यांनी आरोप लावला आहे की, राधे माँ ने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. आम्ही वैष्णो देवी, चिंतपूर्णी देवी आणि 'ज्वालाजी'ची आराधना करतो. राधे माँ स्वतःला दुर्गा देवीचा अवतार सांगते, पण तिने मिनी स्कर्ट परिधान केला होता. हा दुर्गा देवीचा अपमान आहे. यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहे.
मुंबईच्या कांदवली येथे हुंड्यासाठी छळ प्रकरणासह राधे माँला आपल्या सत्संगमध्ये अश्लीलता पसरविण्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईच्या वकील फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांनी मुंबई हायकोर्टात राधे माँ विरोधात अश्लिलता पसरविण्याचा आरोप लावत याचिका दाखल केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.