अपर्णा यादव यांची पंतप्रधान मोदींवर टीका

उत्तर प्रदेशमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. ११ जिल्ह्यांमध्ये ६७ जागांसाठी आज उमेदवार आपलं नशीब आजमातायंत. तर सूबेमध्ये १९ फेब्रुवारीला होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. लखनऊमधील कैंट विधानसभा सीटवर चुरशीची लढाई आहे. मुलायम सिंह यादव यांची लहान सून अपर्णा यादव यांची टक्कर भाजप उमेदवार रिता बहुगुणा आणि बीएसपी उमेदवारासोबत होणार आहे.

Updated: Feb 15, 2017, 04:11 PM IST
अपर्णा यादव यांची पंतप्रधान मोदींवर टीका title=

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. ११ जिल्ह्यांमध्ये ६७ जागांसाठी आज उमेदवार आपलं नशीब आजमातायंत. तर सूबेमध्ये १९ फेब्रुवारीला होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. लखनऊमधील कैंट विधानसभा सीटवर चुरशीची लढाई आहे. मुलायम सिंह यादव यांची लहान सून अपर्णा यादव यांची टक्कर भाजप उमेदवार रिता बहुगुणा आणि बीएसपी उमेदवारासोबत होणार आहे.

अपर्णा यादव सध्या जोरदार प्रचार करत आहेत. अपर्णा यादव यांच्यासाठी आज मुलायम सिंह यादव आणि मोठी सून डिंपल यादव देखील प्रचार करतांना दिसणार आहे.

आज एका रॅलीला संबोधित करतांना अर्पणा यादव यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप उमेदवार रिता बहुगुणा यांच्यावर टीका करण्यात आली आहे. अपर्णा यादव यांनी म्हटलं की, रिता बहुगुणा काँग्रेसच्या नाही होऊ शकल्या त्या तुमच्या काय होणार. अपर्णा यादव यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करत नमामी गंगे प्रकल्पाबाबत म्हटलं की, जे गंगा मातेचे नाही झाले ते तुमचे काय होणार.