अरविंद केजरीवाल यांचं सनी लिओनला पत्र

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही बॉलीवूड तारकांना पत्र लिहिली आहेत, यात सनी लिओनचाही समावेश आहे. केजरीवाल यांनी यात सेलिब्रेटीजना तंबाखूची जाहिरात न करण्याच आवाहन केलं आहे, तसेच तंबाखू निषेध अभियानात सामिल होण्याचं आवाहन केलं आहे.

Updated: Jan 18, 2016, 01:53 PM IST
अरविंद केजरीवाल यांचं सनी लिओनला पत्र title=

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही बॉलीवूड तारकांना पत्र लिहिली आहेत, यात सनी लिओनचाही समावेश आहे. केजरीवाल यांनी यात सेलिब्रेटीजना तंबाखूची जाहिरात न करण्याच आवाहन केलं आहे, तसेच तंबाखू निषेध अभियानात सामिल होण्याचं आवाहन केलं आहे.

दिल्ली सरकारने बॉलीवूड अभिनेता अजय देवगन, शाहरूख खान, सैफ अली खान, गोविंदा, अरबाज खान आणि सनी लिओनला पत्र लिहून पान मसाल्याची जाहिरात न करण्याचं आवाहन केलं आहे.

महिलांकडून तंबाखू सेवनाचा वापर वाढतोय
भारतीय महिलांमध्ये तंबाखू सेवनाचा वापर वाढत आहे, यात पान मसाला तसेच सिगारेटचाही समावेश आहे. सेलिब्रिटीजना वापरून कंपन्या आपला प्रचार करतात, इतर देशांच्या तुलनेत भारतात सिगारेटने तंबाखू ओढण्याचं प्रमाण वाढलं आहे, जाहिरातींचा यावर मोठा परिणाम असल्याचंही सांगण्यात येतंय.