अरविंद केजरीवाल यांनी अपेक्षाभंग केला - अण्णा हजारे

अरविंद केजरीवाल यांनी अपेक्षाभंग केला अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी खंत व्यक्त केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे काही सहकारी तुरुंगात जातायत, तर काही घोटाळ्यांमध्ये अडकतायत, हे पाहून दुःख होत असल्याची प्रतिक्रिया अण्णांनी दिली आहे.

Updated: Sep 6, 2016, 11:33 AM IST
अरविंद केजरीवाल यांनी अपेक्षाभंग केला - अण्णा हजारे title=

मुंबई : अरविंद केजरीवाल यांनी अपेक्षाभंग केला अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी खंत व्यक्त केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे काही सहकारी तुरुंगात जातायत, तर काही घोटाळ्यांमध्ये अडकतायत, हे पाहून दुःख होत असल्याची प्रतिक्रिया अण्णांनी दिली आहे.

केजरीवाल मंत्रिमंडळातले मंत्री संदीप कुमार यांची आक्षेपार्ह सीडी पुढे आल्यानंतर आणि त्यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यावर त्यांना अटक करण्यात आलीय. त्या पार्श्वभूमीवर अण्णांनी ही प्रतिक्रिया दिलीय. तुझ्या पक्षासाठी लोक गोळा करशील पण त्यांचं चारित्र्य कसं तपासणार, असा प्रश्न मी आधीच अरविंदला विचारला होता, पण त्याच्याकडे उत्तर नव्हतं. मला अरविंदकडून ब-याच अपेक्षा होत्या, तो भारतीय राजकारणात वेगळं उदाहरण प्रस्थापित करेल, असं वाटलं होतं. पण त्या सगळ्या अपेक्षा फोल ठरल्यात, असं अण्णा म्हणाले.