`केजरीवाल` सरकारकडून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या स्टिंग ऑपरेशनसाठी `कॉमन मॅन`ला धडे

भष्ट्राचाराने हैराण असलेल्या सर्वसामान्यांना आम आदमीने कडक पावलं उचलली आहेत. आम आदमी पार्टी लवकरच एक चार अंकी नंबर जारी करणार आहे.

Updated: Jan 9, 2014, 10:56 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भष्ट्राचाराने हैराण असलेल्या सर्वसामान्यांना आम आदमीने कडक पावलं उचलली आहेत. आम आदमी पार्टी लवकरच एक चार अंकी नंबर जारी करणार आहे.
हा नंबर म्हणजे भ्रष्टाचार विरोधातील हेल्पलाईन नसेल, तर या नंबरवर फोन केल्यानंतर तक्रारदाराच्या मदतील एक अधिकारी असेल, तो अधिकारी तक्रारदाराला स्टिंग ऑपरेशन कसं करता येईल, याचे धडे देणार आहे.
स्टिंग ऑपरेशननंतर अधिकाऱ्यांना तक्रारदार संपर्क करेल आणि त्यानंतर आरोपीला रंगेहाथ पकडण्यासाठी ट्रॅप लावण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.
आम आदमी पार्टीला लोकांनी भ्रष्टाचार निर्मुलनासाठी निवडून दिलं आहे. म्हणजेच जनता ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. जनता भ्रष्टाचाराने हैराण आहे, म्हणून दिल्ली सरकार भ्रष्टाचाराविरोधात कडक उपाययोजना करणार असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
या हेल्पलाईनमुळे दिल्लीतील प्रत्येक नागरिक भ्रष्टाचाराविरोधात लढणारा एक योद्धा होणार आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे.
तसेच मागील सरकारवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचीही आपण चौकशी करणार असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजप नेते हर्षवर्धन यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हा सवाल केला होता. त्यावर लवकरच भ्रष्टाचाराची मोठी प्रकरणंही चौकशीसाठी आली असल्याचं आपल्याला दिसेल असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलंय.
फक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाच नाही तर मोठ्या स्तरावरील भ्रष्टाचाराशी लढण्याचीही तयारी सुरू असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.