असदुद्दीन ओवीसींचा पवारांवर पलटवार

 एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पलटवार केला आहे

Updated: Nov 20, 2014, 06:50 PM IST
असदुद्दीन ओवीसींचा पवारांवर पलटवार title=

नवी दिल्ली :  एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पलटवार केला आहे

“भाजपने एमआयएमला मदत केली, असं शरद पवार म्हणतात. मात्र पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने असं वक्तव्य करणं हे हास्यास्पद आहे”, असं उत्तर ओवेसींनी शरद पवारांना दिलं आहे. असुदुद्दीन ओवेसींवर यांनी ‘हिंदुस्थान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलंय.

राज्यात एमआयएम वाढण्यास भाजपचा एका गट जबाबदार असल्याचा आरोप, शरद पवार यांनी मंगळवारी अलिबाग येथील पक्षाच्या चिंतन शिबिरात केला होता. त्याला ओवेसींनी उत्तर दिलं आहे.

 पाहा काय म्हणाले असदुद्दीन ओवीसी?
“महाराष्ट्रात भाजपला सत्तेत येण्यापासून  काँग्रेस – राष्ट्रवादी रोखू शकली नाही. काँग्रेसने महाराष्ट्रात अल्पसंख्यांक आणि मागासवर्गियांसाठी काहीही केलं नाही. त्यामुळेच आम्ही निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीला आम्ही आव्हान दिलं. भाजपने एमआयएमला मदत केली, असं शरद पवार म्हणतात. मात्र पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने असं वक्तव्य करणं हे हास्यास्पद आहे”.
 
“शरद पवारांनी काँग्रेससोबतची युती का तोडली? त्यांनी याबाबतचा निर्णय आताच का घेतला? याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये जातील याची पवारांना भीती होती”

एमआयएम फक्त मुसलमानांचा पक्ष नाही, असं सांगत ओवीसी यावर दाखला देतांना म्हणतात, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आम्ही 24 उमेदवार उभे केले. यापैकी पाच उमेदवार मुसलमान नाहीत. यात तर एका दलित उमेदवार देखिल आहे आमची मतदानाची टक्केवारी 0.96 टक्के आहे. यावरून आम्हाला मुस्लिमांशिवाय इतरांनीही मतदान केल्याचं स्पष्ट होतं”, असं ओवेसींनी म्हटलं आहे.

आपण ज्या भागात दौऱ्यावर जातो, तेथे प्रत्येक ठिकाणी मुस्लिम युवक आपल्यासाठी राजकीय आवाजाची गरज असल्याची मागणी करतो, असंही ओवीसी यांनी मुलाखतीत म्हटलं आहे.

फक्त मतं मिळवणं हे एमआयएमचं ध्येय नाही. आपल्याला पक्षबांधणी करायची आहे. उत्तर प्रदेश हे देशातील मोठं राज्य आहे. आम्ही या राज्यातील 20-30 जिल्ह्यात पक्षबांधणी सुरू आहे. 

उत्तर प्रदेशशिवाय पश्चिम बंगालही महत्त्वाचं आहे. त्यामुळे यूपी आणि बंगालमध्ये आम्ही निवडणूक लढवणार आहोत. मात्र दिल्लीबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचं असदुद्दीन ओवेसींनी यांनी स्पष्ट केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.