आसाराम बापूची जामीन याचिका पुन्हा फेटाळली

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेल्या आसाराम यांचा जामीन अर्ज राजस्थानातील जोधपूर उच्च न्यायालयाने फेटाळलाय.

Updated: Feb 10, 2014, 06:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जोधपूर
अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेल्या आसाराम यांचा जामीन अर्ज जोधपूर उच्च न्यायालयाने फेटाळलाय.
जोधपूर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश निर्मलजीत कौर यांच्या खंडपीठानं आरोपी आसारामचा जामीन अर्ज फेटाळलाय. याआधीही आसाराम यांची जामीन याचिका फेटाळण्यात आली होती. गेल्या सोमवारी दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. आज उच्च न्यायालयाने यासंबंधात निर्णय जाहीर केला. त्यात आसाराम यांची जामीन याचिका फेटाळण्यात आलीय.
आसाराम यांचे वकील राम जेठमलानी यांनी उच्च न्यायालयासमोर युक्तीवाद केला होता. तुरुंगात आसाराम यांची प्रकृती खालावली आहे. मुली स्वतःच आसाराम यांच्या आश्रमात आल्या होत्या, असा युक्तीवाद राम जेठमलानी यांनी केला होता.
गुरुकुलमधील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून १ सप्टेंबर २०१३ पासून आसाराम जोधपुरच्या मध्यवर्ती तुरुंगात आहेत.

.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.