आसाराम बापूच्या मुलाला जामीन मंजूर

बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला गुजरात हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय. 

Updated: Apr 16, 2015, 08:01 PM IST
आसाराम बापूच्या मुलाला जामीन मंजूर title=

अहमदाबाद : बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला गुजरात हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय. 

नारायण साईनं आपल्या आईची तब्येत बरी नसल्यानं कोर्टाकडे जामीन मंजूर करण्याची मागणी केली होती. आपले वडील आसाराम बापूदेखील तुरंगात आहेत, अशा वेळी आईच्या तब्येतीकडे पाहण्यासाठी कुणीही नसल्याचं कारणंही नारायण साईनं दिलं होतं. 

यानंतर कोर्टानं नारायण साईच्या अर्जावर त्याला तीन आठवड्यांचा जामीन मंजूर केलाय. १ मेपासून हा जामीन मंजूर करण्यात आलाय. 

परंतु, जामीनाच्या कालावधीत अहमदाबादच्या मोटेरा आश्रमात जाण्यासाठी मात्र नारायण साईला बंदी घालण्यात आलीय. जामीनाच्या कालावधीत नारायणला सतत पोलिसांच्या संपर्कात राहण्याचे आदेशही देण्यात आलेत. पोलीस अधिकारी गुजरातचे डीजीपी ठरवतील. नियम तोडले गेले तर जामीन तात्काळ रद्द करण्यात येईल, असंही कोर्टानं बजावलंय. 

नारायण साईवर सूरतच्या एका मुलीनं बलात्काराचा आरोप केलाय. यासोबतच, त्याच्यावर अनेक गंभीर आरोपही आहेत. यामुळेच, गेल्या दीड वर्षांहून अधिक काळापासून नारायण साई सुरतच्या तुरुंगात आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.