काँग्रेसचे औरंगजेब प्रेम कायम, दिल्लीत बेकायदा दुसऱ्या रस्त्याला नाव

काँग्रेसचे औरंगजेब प्रेम कमी होताना दिसत नाही. दिल्लीतील औरंगजेब रस्त्याला भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम असे करण्यात आले आहे. पण दुसऱीकडे काँग्रेसच्या एका माजी आमदाराने दिल्लीतील एका दुसऱ्या रस्त्याला बेकायदा औरंगजेबाचे नाव दिल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Updated: Sep 3, 2015, 07:26 PM IST
काँग्रेसचे औरंगजेब प्रेम कायम, दिल्लीत बेकायदा दुसऱ्या रस्त्याला नाव title=

नवी दिल्ली : काँग्रेसचे औरंगजेब प्रेम कमी होताना दिसत नाही. दिल्लीतील औरंगजेब रस्त्याला भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम असे करण्यात आले आहे. पण दुसऱीकडे काँग्रेसच्या एका माजी आमदाराने दिल्लीतील एका दुसऱ्या रस्त्याला बेकायदा औरंगजेबाचे नाव दिल्याचा प्रकार समोर आला आहे. 

ओखला येथील काँग्रेसचे माजी आमदार आसिफ मोहम्मद खान यांनी कालिंदी कुंज ते जामिया नगर या रस्त्याचं नामकरण स्वत:हून औरंगजेब रोड असं करून टाकलं आहे. यावरून या नामांतरणाचा वादही धगधगत राहील अशी चिन्हे आहेत.

अधिक वाचा : रस्त्यांच्या, जिल्ह्यांच्या नामांतराला मुस्लीम संघटनांचा विरोध

तीन किलोमीटर लांबीच्या या रस्त्याला पूर्वापार पुश्ता रोड असं म्हटलं जातं. परंतु, हिंदुत्वाच्या विचारसरणीला विरोध करणा-या आसिफ खान यांनी आपल्या मतदारसंघातल्या रस्त्याला औरंगजेबाचं नाव बेकायदापणे देत आधीच्या नामबदलाप्रती आपला विरोध नोंदवला आहे.

औरंगजेब हा थोर व्यक्ती होता आणि अब्ब्दुल कलाम थोर नव्हते असं आपलं म्हणणं नाही, खान सांगतात. परंतु औरंगजेब हा आपल्या इतिहासाचा भाग असल्याचं आपण नाकारू शकत नाही, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहासाची पुनर्रचना करण्याचा हा कट असल्याचा आरोप आसिफ खान यांनी केला आहे. पुढच्या पिढीनं हिंदुत्वाची विचारधारा आत्मसात करावी असा हा प्रयत्न असल्याचा आक्षेप त्यांनी नोंदवला आहे. 

अधिक वाचा : दिल्लीतील या रोडला एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव

दिल्ली महानगरपालिकेत भाजपाचं सरकार असून ते औरंगजेब रस्त्याची पाटी काढायचा प्रयत्न करतील पण आपण ते होऊ देणार नाही असा इशाराही खान यांनी दिला आहे. 

दरम्यान दिल्ली मनपाच्या अधिका-यांनी आसिफ खान यांची कृती बेकायदेशीर असून योग्य ती कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x