हैदराबाद : शहरात एका उद्योजकावर एके ४७ ने गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबार करणारा अज्ञात व्यक्ती एके ४७ घटनास्थळी सोडून फरार झाला आहे.
अरबिंदो फार्मा कंपनीचे संचालक नित्यानंद रेड्डी यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने एके-47 मधून गोळीबार केल्याची घटना बुधवारी सकाळी सातच्या सुमारास येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड्डी हे सकाळी चालण्यासाठी केबीआर पार्कमध्ये आले होते. फिरून झाल्यानंतर ते मोटारीमध्ये बसत असताना, एका व्यक्तीने एके-47 मधून त्यांच्यावर तीन वेळा गोळीबार केला.
गोळीबाराचा आवाज ऐकून रेड्डी यांचा भाऊ आणि अनेक नागरिक घटनास्थळी पळत आले. यावेळी हल्लेखोर एके-47 जागेवरच ठेवून पळून गेला. रेड्डी यांनी गोळीबार चुकविला असून ते सुरक्षित आहेत.
दरम्यान, उच्चभ्रू भागामध्ये गोळीबार झाल्याची घटना घडल्यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी एके-47 ताब्यात घेतली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.