www.24taas.com, जोधपूर
जोधपूरच्या लक्ष्मीने बालविवाह करण्यास नकार देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला... कुटुंब आणि समाजाने तिच्यावर बहिष्कार टाकला... मात्र, तिने बालिकावधू बनण्यास ठाम नकार दिला... आता, लक्ष्मी पुन्हा एकदा बोहल्यावर चढलीय मात्र, यावेळी तीने तिच्या आवडीचा नवरदेव निवडून सात फेरे घेतलेत.
जल्लोष... नवीन विचारांना स्वीकारण्याचा... जल्लोष... जुन्या विचारांना मुठमाती देण्याचा... यासाठी जोधपूरमधल्या लुणी गावात राहणाऱ्या लक्ष्मीचं साहस प्रेरणादायी ठरलंय. लक्ष्मीनं बालविवाह करण्यास नकार देऊन देशासमोर आदर्श निर्माण केलाय. लक्ष्मी एका वर्षाची असताना तिचा विवाह ठरवला गेला होता. मात्र, तो विवाह तिने अमान्य केला आणि आता आपल्या मर्जीतील जीवनसाथी निवडून त्याच्यासोबत तिनं विवाह केलाय. लक्ष्मी शाळेची पायरीसुध्दा चढलेली नाही. पण, बालविवाहाविरोधात लक्ष्मीला स्वत:च्या कुटुंबीयांशी आणि समाजाशी लढावं लागलं... ती लढली... आणि त्याविरोधात न्यायालयात जाऊन या क्रू-प्रथेविरुरोधात लढाई जिंकलीही.
लक्ष्मीच्या या लढाईत अनेक सामाजिक संघटनांनी तिला मदत केलीय. तिने दाखवलेल्या साहसाबद्दल मुंबईत बोलावून तिचा नुकताच सत्कारही करण्यात आला. आपल्या कृतीतून ‘बालिका वधू बनू नका` असा संदेश ग्रामीण भागातील या झीशीच्या राणीनं दिलाय. शेवटी, आपले विचार बदलतील तेव्हाच देश बदलणार आहे. झी २४ तासचा या रणरागिणीला सलाम...