ओबामा यांच्या दौऱ्याचा आज शेवटचा दिवस

बराक ओबामा यांच्या तीन दिवसीय भारत दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे.  नोबेल पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यर्थी, यांची बराक ओबामा आज भेट घेणार आहेत.  

Updated: Jan 27, 2015, 09:34 AM IST
ओबामा यांच्या दौऱ्याचा आज शेवटचा दिवस

नवी दिल्ली  : बराक ओबामा यांच्या तीन दिवसीय भारत दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे.  नोबेल पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यर्थी, यांची बराक ओबामा आज भेट घेणार आहेत.  

ही माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे. सत्यर्थी यांना बाल हक्कांसंदर्भातील कामगिरीसाठी शांततेच्या नोबेलचा सन्मान देण्यात आला आहे.
 
सत्यर्थींची भेट घेतल्यानंतर बराक ओबामा सकाळी साडेदहा वाजता सीरी फोर्ट ऑडिटोरियममध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात संबोधित करतील. या कार्यक्रमाला काही विद्यार्थ्यांसह दोन हजार जण उपस्थित राहतील असं सांगण्यात येतंय.
 
ओबामा आज दुपारी भारतातून रवाना होणार आहेत. सीरी फोर्टमधील कार्यक्रमानंतर बराक ओबामा पत्नी मिशेल यांच्यासह सौदी अरेबियाला रवाना होतील. सौदी अरेबियाचे दिवंगत किंग अब्दुल्ला यांना ओबामा श्रद्धांजली वाहणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.