नवी दिल्ली : नोटबंदीनंतर अनेकांच्या खात्यामध्ये पैशांचा पाऊस होत आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये देखील पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे. जेथे एक न्हावी दिलशाद हा शंभर कोटींचा मालक बनला आहे.
दिलशादच्या मोबाईलवर ९९.९९ कोटी जमा झाल्याचा मॅसेज आला. त्यानंतर दिलशाद सगळ्यांना सांगू लागला की, मोदी सरकारने त्यांचं आश्वासन पाळलं आहे. सरकारने त्याच्या खात्यात पैसे जमा केले आहे.
हा मॅसेज स्टेट बँकेकडून आला होता. ज्यामध्ये लिहिलं होतं की, ९९ कोटी. ९९ लाख ९९९ रुपये तुमच्या खात्यात क्रेडिट झाले आहेत. सकाळ होताच दिलशानने एटीएममध्ये जाऊन बँलेस चेक केला तर त्यामध्ये देखील एवढीच रक्कम दाखवली गेली.