भोपाळ दहशतवादी फरार आणि एन्काऊंटरमध्ये मोठा खुलासा

आधी जेलमधून कैदी फरार आणि त्यानंतर त्या ८ दहशतवाद्यांचं  एनकाउंटर या घटनेने भोपाळला हलवून टाकलं होतं. आता या प्रकरणात एक नवा खुलासा झाला आहे. 

Updated: Nov 1, 2016, 09:17 AM IST
भोपाळ दहशतवादी फरार आणि एन्काऊंटरमध्ये मोठा खुलासा title=

भोपाळ : आधी जेलमधून कैदी फरार आणि त्यानंतर त्या ८ दहशतवाद्यांचं  एनकाउंटर या घटनेने भोपाळला हलवून टाकलं होतं. आता या प्रकरणात एक नवा खुलासा झाला आहे. 

एनकाउंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता जो खुलासा झाला आहे त्यामध्ये कारावास प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. भोपाळ जेलमध्ये सुरक्षेच्या बाबतीत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. भोपाळ सेंट्रल जेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तर आहेत पण ते कामच करत नसल्याचं समोर आलं आहे. 

दूसरी चूक अशी की, एकसोबत जवळपास ४० टक्के जेल स्टाफ हा सुट्टीवर गेला होता. जेल स्टाफला दिवाळीची सुट्टी देण्यात आली होती. याचाच फायदा घेत सीमीच्या या दहशतवाद्यांनी जेलमधून पळ काढला.