नवी दिल्ली: बिहारमध्ये दिवाळी आधीच निवडणूकीचे फटाके फुटणार आहेत. आज निवडणूक आयोगानं बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या अध्यक्ष नसीम झैदी यांनी पत्रकार परिषद घेऊन तारखा जाहीर केल्या.
बिहारमध्ये ५ टप्प्यात मतदान
बिहारमध्ये ५ टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा १२ ऑक्टोबर, दुसरा १६ ऑक्टोबर आणि २८ ऑक्टोबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. तर १ आणि ५ नोव्हेंबरला चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदान होईल. तर ८ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
वैशिष्ट्यपूर्ण निवडणूक
बिहार निवडणुकीत निवडणूक आयोगानं महत्त्वाची सुरूवात केलीय. आता बिहार निवडणुकीत इव्हीएम मशीनवर उमेदवाराच्या नाव आणि चिन्हासह फोटोही दिसणार आहे. तर प्रत्येक मतदान केंद्रावर CRPF जवान तैनात असतील.
निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद महत्त्वाचे मुद्दे-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.