धक्कादायक, लाच न देऊ शकल्याने बाळाला दिला फुटपाथवर जन्म

सरकारी रूग्णालयात मागितलेली लाच देऊ न शकल्याने, एका महिलेला फुटपाथवरच मुलाला जन्म द्यावा लागला आहे. मात्र जन्मानंतर योग्य निगा राखली न गेल्याने नवजात बालक मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय..

Updated: Jan 21, 2015, 06:39 AM IST
धक्कादायक, लाच न देऊ शकल्याने बाळाला दिला फुटपाथवर जन्म  title=

भोपाल : सरकारी रूग्णालयात मागितलेली लाच देऊ न शकल्याने, एका महिलेला फुटपाथवरच मुलाला जन्म द्यावा लागला आहे. मात्र जन्मानंतर योग्य निगा राखली न गेल्याने नवजात बालक मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय..

शासनामार्फत शासकीय रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी आणि उपचारासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. मात्र अजमेर खान हे त्यांच्या गर्भवती पत्नीला घेऊन शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल झाले. मात्र तेथील कर्मचाऱ्याने रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितली. 
अजमेर हे रोजंदारीवर काम करतात. त्यामुळे त्यांना एक हजार रुपयांची मोठी रक्कम उभी करणे शक्‍य झाले नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नीची फूटपाथवरच प्रसूती झाली. मात्र जन्मानंतर नवजात बालकाला योग्य ते उपचार न मिळाल्याने काही वेळातच त्याचा फूटपाथवरच मृत्यू झाला. त्यामुळे अजमेर यांच्या कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनावर आगपाखड केली. त्यानंतर मध्यस्थीसाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले.

 या घटनेनंतर वैद्यकीय दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनाने चक्क फेटाळून लावला आहे. याप्रकरणी शवविच्छेदनानंतर रुग्णालय प्रशासनावर पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.