दावोस : सर्व भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जगामध्ये विश्वासू आणि जबाबदार देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्विस रिसॉर्टच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.
स्विस रिसॉर्टने सन २०१५ साठी जगातील सर्वांत विश्वासू आणि जबाबदारी असणाऱ्या २७ देशांचे सर्व्हेक्षण केले. यामध्ये भारताने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
यूएई, भारत, चीन आणि नेदरलॅंड असे पहिले चार विश्वासू देश आहेत. यानंतर जपान, रशिया, हॉंग कॉंग, दक्षिण आफ्रिका आणि इटली, ब्राझील, मलेशिया, फ्रान्स आणि अमेरिकेचा अनुक्रमे क्रमांक आहे.
सर्व्हेक्षणादरम्यान सरकार, व्यवसाय, प्रसारमाध्यमे व सामाजिक संस्थांचा अभ्यास करण्यात आला आहे. अहवालाच्या पहिल्या पानावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आले आहे.
जगातील इतर देश भारताकडे एका वेगळ्या नजरेने पाहू लागले आहेत. सन 2014 मध्ये भारत पाचव्या क्रमांकावर होता. भारताने यंदा दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.