उत्तर प्रदेशात हत्ती आणि सायकलला मागे टाकत कमळ फुलणार - सर्वे

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांआधी झालेल्या सर्वेमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभरतांना दिसत आहे. या सर्वेनुसार बहुजन समाज पक्ष दूसऱ्या तर समाजवादी पक्ष हा तिसऱ्या स्थानावर असणार आहे. काँग्रेसची अवस्था या सर्वेमध्ये फार बिकट दिसते आहे.

Updated: Oct 13, 2016, 05:08 PM IST
उत्तर प्रदेशात हत्ती आणि सायकलला मागे टाकत कमळ फुलणार - सर्वे title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांआधी झालेल्या सर्वेमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभरतांना दिसत आहे. या सर्वेनुसार बहुजन समाज पक्ष दूसऱ्या तर समाजवादी पक्ष हा तिसऱ्या स्थानावर असणार आहे. काँग्रेसची अवस्था या सर्वेमध्ये फार बिकट दिसते आहे.

ओपिनियन पोलनुसार उत्तर प्रदेशात कमळ फुलतांना दिसणार आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभरणार आहे. भाजपला बसपा आणि सपापेक्षा अधिक मतदान होणार असल्याचं दिसत आहे.

सर्वेनुसार भाजपला उत्तर प्रदेशात 31 टक्के वोटसह 170-183 जागा मिळण्याची शक्यता आहे. बसपा दूसरे स्थानावर दिसत आहे. बसपाला 28 टक्के मतांसोबत 115 ते 124 जागा मिळण्याची शक्यता आहे. 403 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत दोन्ही ही पक्ष हे बहुमताच्या आकड्यापासून दूरच दिसत आहे. 

सध्या सत्तेत असलेल्या समाजवादी पक्षाला 94 ते 103 जागा मिळू शकतात. काँग्रेसला मात्र 08 से 12 जागा मिळण्याची शक्यता दिसते आहे. अपक्षांना  02 ते 06 जागा मिळतांना दिसत आहे.