उद्यापासून हिवाळी अधिवेशन; जीएसटी मंजूर होणार?

उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशऩात जीएसटी विधेयक मंजूर व्हावं यासाठी आता सरकारनं कसोशिचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

Updated: Nov 25, 2015, 04:17 PM IST
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; जीएसटी मंजूर होणार? title=

नवी दिल्ली : उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशऩात जीएसटी विधेयक मंजूर व्हावं यासाठी आता सरकारनं कसोशिचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व नेत्यांकडे 'जीएसटी'साठी मदत करण्याची विनंती केली. त्याआधी अर्थमंत्री अरुण जेटलींनी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चाही केली. 

'जीएसटी' घटना दुरुस्तीच्या विधेयकला लोकसभेत मंजुरी मिळालीय. पण राज्यसभेत सरकारकडे घटना दुरुस्तीसाठी आवश्यक दोन तृतीअंश बहुमत नाही. त्यामुळे काँग्रेसची साथ मिळाल्याशिवाय जीएसटी घटना दुरुस्तीचं विधेयक लटकलंय. 

उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जर विधेयक मंजूर झालं नाही, तर १ एप्रिल २०१६ पासून जीएसटी लागू करणं शक्य होणार नाही.  बदल मान्य झाले, तरच पाठिंबा देऊ असा काँग्रेसचा सध्याचा पवित्रा आहे. त्यामुळे, मोदी सरकारची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं चित्र निर्माण झालंय. 

दरम्यान, शिवसेनेनं आता जीएसटीबाबत नवी मागणी पुढे केलीये. जीएसटीमध्ये जसा राज्यांना हिस्सा आहे, तसा महापालिकांनाही मिळावा, शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी म्हटलंय. ही मागणी पूर्ण झाली नाही, तर जीएसटीला विरोध राहील, असा इशाराही अडसूळ यांनी दिलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.