नवी दिल्ली : आम आदमी पार्टीतून थेट भाजपमध्ये दाखल झालेल्या किरण बेदी यांना भाजपने मुख्यमंत्री पदाच्या रिंगणात उतरवले. मात्र, त्यांना बळीचा बकरा केल्याची टीका आम आदमी पार्टीचे नेते सोमनाथ भारती यांनी केली आहे. पराभवाचं खापर मोदींच्या माथी फुटू नये यासठी भाजपची ही खेळी असल्याचंही ते म्हणालेत.
तर दुसरीकडे मुंबईत दिल्लीचे लोक शहाणे आहेत, ते शहाणपणानं निकाल देतील' अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ते झी 24 तासच्या 'रोखठोक' या कार्यक्रमात बोलत होते.
देशात नरेंद्र मोदी आणि दिल्लीत किरण बेदी, अशी भाजपची नवी घोषणा असणार आहे. कारण भाजपमध्ये अलिकडेच प्रवेश करणा-या किरण बेदी याच दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपच्या उमेदवार असणार आहेत. दिल्लीतील उमेदवार निवडीसाठी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक काल रात्री पार पडली. या बैठकीत बेदींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी किरण बेदींच्या नावाची घोषणा केली. किरण बेदी कृष्णानगरमधून निवडणूक लढवणार असून भाजपच्या प्रचार समितीची धूराही किरण बेदींच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.