देशातील १०१ नद्यांचं जलमार्गात रुपांतर होणार : गडकरी

रस्ते आणि लोहमार्ग वाहतुकीपेक्षा स्वस्त पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्वाकांक्षी योजना आखली आहे.

Updated: Jan 20, 2015, 12:01 AM IST
देशातील १०१ नद्यांचं जलमार्गात रुपांतर होणार : गडकरी title=

नवी दिल्ली : रस्ते आणि लोहमार्ग वाहतुकीपेक्षा स्वस्त पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्वाकांक्षी योजना आखली आहे.

देशभरातील १०१ नद्यांचं जलमार्गात रुपांतरण करण्याची योजना लवकरचं  संसदेत विधेयक मंजुरीसाठी येईल, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
 
रस्ते आणि रेल्वे वाहतुकीच्या तुलनेत जलमार्ग वाहतुकीचा पर्याय अतिशय स्वस्त आहे. तरीही देशातील नद्यांचा जलमार्गाच्या दृष्टीनं फारसा वापर झालेला नाही. रेल्वे वाहतुकीसाठी प्रति किलोमीटर 1 रुपया खर्च येतो, तर रस्ते वाहतुकीसाठी हाच खर्च दीड रुपया आहे.
 
तर जलवाहतुकीसाठी किलोमीटरला फक्त 50 पैसे खर्च आहे. त्यामुळं नद्या, तलाव, खाड्यांचा वापर योग्य पद्धतीनं केला तर 14 हजार 500 किलोमीटरचं जलमार्गाचं जाळं विस्तारता येईल. महाराष्ट्रासाठीही या प्रकल्पाचा चांगला उपयोग होऊ शकतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.