'प्रियांका गांधींपेक्षा सुंदर चेहरा भाजपाकडे'

महिलांबद्दल या देशातली परिस्थिती कधी सुधारणार, असा उद्विग्न सवाल पुन्हा विचारण्याची वेळ आलीय.... कारण राजकीय नेतेच महिलांबद्दल वादग्रस्त विधानं करतायत. भाजप नेते विनय कटियार यांची प्रियांका गांधींबद्दल बोलताना जीभ घसरलीय.  

Updated: Jan 25, 2017, 04:00 PM IST
'प्रियांका गांधींपेक्षा सुंदर चेहरा भाजपाकडे' title=

लखनऊ : महिलांबद्दल या देशातली परिस्थिती कधी सुधारणार, असा उद्विग्न सवाल पुन्हा विचारण्याची वेळ आलीय.... कारण राजकीय नेतेच महिलांबद्दल वादग्रस्त विधानं करतायत. भाजप नेते विनय कटियार यांची प्रियांका गांधींबद्दल बोलताना जीभ घसरलीय.  

प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात येण्याची चर्चा सुरु होताच, प्रियांका गांधींहून जास्त सुंदर चेहरे भाजपमध्येही स्टार प्रचारक म्हणून आहेत.... अनेक हिरोईन्स भाजपमध्ये आहेत... अनेक हिरोईन आणि मॉडल्स राजकीय पक्षांचा प्रचार करतात, असं वादग्रस्त वक्तव्य विनय कटियार यांनी केलंय.
 
काँग्रेसला वाटतं की, प्रचारासाठी त्यांच्याकडे प्रियांका गांधींचा सुंदर चेहरा आहे... ज्याचा वापर प्रचारासाठी केला जाऊ शकतो... पण, सुंदरता आणि क्षमता यांची गल्लत करण्याची चूक काँग्रेस करत आहे, असंही कटियार यांनी म्हटलंय.

शरद यादव यांची वायफळ बडबड

'व्होट की इज्जत बेटी की इज्जतसे जादा होती है' असं वादग्रस्त विधान जेडीयूचे नेते शरद यादव यांनी करत आपल्या अकलेचे तारे तोडलेत.